Slide 2

डॅशबोर्ड (प्राप्त झालेले अर्ज)

2000

नवीमुंबई

3000

ठाणे

1000

पालघर

अर्जाची सद्यस्थिती

मनोगत

जनता दरबार – नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे प्रभावी माध्यम नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या थेट सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणजे जनता दरबार.

मा. ना. श्री. गणेश नाईक यांनी आपल्या प्रत्येक मंत्रीपदाच्या कार्यकाळात, अगदी 1995 पासून, आर्थिक विकासासोबतच जनतेला एकत्र घेऊन जनता दरबाराच्या माध्यमातून थेट संवादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे "जनता दरबार" हा संकल्पना आणि ना. श्री. गणेश नाईक हे समीकरण सर्वमान्य झाले आहे.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुशासन प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्याच दृष्टीने, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी परिणामकारक प्रशासन निर्माण करण्यासाठी भक्कम भूमिका बजावली आहे. या संकल्पनेस पूरक असा "जनता दरबार" हा उपक्रम म्हणजे नागरिकांना त्यांच्या कामांसाठी दिलासा देणारा आणि विश्वास वाढवणारा जनहितकारी उपक्रम आहे.

राज्याच्या मंत्रालयात (सचिवालय) कामे केली जातातच. परंतु, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर किंवा शहराच्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या समक्ष ऐकून घेणे आणि तिथेच तत्काळ त्यांचे निराकरण करणे हे जनता दरबाराच्या आयोजनामागील मुख्य उद्दीष्ट आहे. जनता दरबारामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळते, शासन प्रक्रियेवर विश्वास वाढतो आणि प्रशासनही ठरलेल्या वेळेत जबाबदारी पार पाडण्यास बांधील राहते.

शासनाच्या निर्णय प्रक्रियेला गती देणारा, शासन व जनतेला जोडणारा परिणामकारक सेतू म्हणजे जनता दरबार! जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात आणि असा दिवस यावा की कोणत्याही नागरिकाला जनता दरबारात उपस्थित राहण्याची गरजच भासू नये, ही ना. श्री. गणेश नाईक यांची भूमिका आहे. तो दिवस आला की, जनता दरबाराचा खरा हेतू पूर्णतः साध्य झाल्याचे समाधान मिळेल, असे त्यांचे मत आहे.

Ganesh Naik

मिडिया गॅलरी

जनतेचा अभिप्राय

Icon
सौ. चौधरी

आमच्या इथे वॉटर ATM करता निवेदन दिले होते त्यावर योग्य ती कार्यवाही होऊन ATM बसवण्यात आले त्या करिता धन्यवाद

Icon
सौ. चव्हाण

आमच्या इथे वॉटर ए.टी.एम. करता निवेदन दिले होते त्यावर योग्य ती कार्यवाही होऊन ए.टी.एम. बसवण्यात आले त्या करिता धन्यवाद.